सातारा येथे होत असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात पुस्तक स्टॉल मध्ये मी लिहिलेले संत शेख महंमद महाराज चरित्र ग्रंथ व संत शेख महंमद महाराज लिखित योगसंग्राम ग्रंथ विक्रीसाठी श्री. चोभे सरांच्या स्टॉलवर उपलब्ध आहेत..
ज्यावेळेस आपण सेवा समर्पण त्यागवृत्तीने कार्य करतो. संत विचाराने चालतो .. त्यावेळेस भगवंतच ते कार्य पुढे घेऊन जातात. महाराष्ट्र, भारतभर व भारताबाहेर संत शेख महंमद महाराज यांचे साहित्य वाचक वाचत आहेत. ही खरंच माझ्यासारख्या एका छोट्याश्या माणसाला लाभलेली संतकृपाच होय. हे संत विचार कार्य समाजात रुजावे .. समाज प्रबोधन व्हावे . यासाठी आमचे संत शेख महंमद महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष ह भ प सिद्धिनाथ महाराज मेटे, सोमनाथ महाराज मेटे, शेलार सर , पगारे सर व सर्व वारकरी , व प्रतिष्ठान मार्फत हे कार्य पुढे घेऊन जात आहेत. तसेच आम्हाला सहकार्य करणारे ज्ञात अज्ञात लेखक , कवी ,साहित्यिक प्रकाशक , संत साहित्य अभ्यासक या सर्वांचे आभार.
चला संत विचार जगूया
संत विचाराने चालूया
जीवन आनंदमय करूया