About

About us सप्रेम नमस्कार हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक संत शेख महंमद महाराज ता - आष्टी जिल्हा-बीड

हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असणार्‍या संत शेख महंमद महाराजांचा जन्म वाहिरा (ता.आष्टी, जि.बीड) येथे झाला. गुरु चांदबोधले यांचेकडून त्यांनी अनुग्रह घेतला होती. संत शेखमहंमद महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांचे गुरु होते. संत शेख महंमद महाराजांनी संत तुकाराम महाराजांना पहिल्यांदा कीर्तनास उभे केले. ‘जिंदा पीर’म्हणविणार्‍या औरंगजेबाने आष्टी तालुक्यातील वाहिरा या जन्मगावी 400 एकर जमीन इनाम दिली होती. संत परंपरेतील दीर्घायुष्य लाभलेले संत म्हणून शेख महंमद महाराज यांचा उल्लेख होतो. "ज्ञानाचा एका, नामाचा तुका आणि कबीराचा शेखा" अशी म्हण प्रचलित आहे. एकूणच कबिरांच्या विचारधारेचा त्यांनी स्वीकार केला होता. 26 जानेवारी 2021 रोजी राजधानी दिल्ली येथे राजपथावर महाराष्ट्र शासनाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या संस्कृतिक कार्यक्रमात "संत परंपरा, भक्ती शक्ती" दर्शन घडविणारा चित्र रथ साकारण्यात आला त्यामध्ये संत शेख महंमद महाराजांची मुर्ती बसवण्यात आली होती. संत शेख महमंद महाराजांनी योगसंग्राम, पवनविजय, निष्कलंक - प्रबोध, ज्ञान गंगा, साठी संवत्सर, भक्तिबोध, आचारबोध, भारुडं, दक्खिनी रचना, पारिभाषिक कोश, दुचेश्मा व अभंग अशी साहित्य संपदा निर्माण केली होती. हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असणार्‍या संत शेख महंमद महाराजांनी आपल्या साहित्यात मानवी जीवन मूल्यांची जोपासना केली आहे. अंधश्रध्दा, कर्मकांड, चुकीच्या प्रथा परंपरा यांच्यावर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. अनमोल मानवदेहाचे सार्थक करण्याचा कल्यानाचा मार्ग त्यांनी साहित्यात सांगितला आहे. त्यांच्या याच विचाराने प्रेरीत होऊन त्यांच्या विचारांची परंपरा पुढे चालविण्याच्या उद्देशाने श्री संत शिरोमणी शेख महंमद महाराज प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली.

Our key areas of focus

Concern About Our Mission

संत शेख महंमद महाराज लिखित योगसंग्राम, निष्कलंक प्रबोध, चरित्र, पवन विजय, अभंग आदी. साहित्य तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी काम करणे. कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून प्रचार - प्रसार करणे, संपूर्ण मानव जातीसाठी आध्यात्मिक परिपूर्णता स्वतःच्या आनंदासाठी व जगाच्या आनंदासाठी कार्य करणे आदि.

ध्यान केंद्र उभारणे, वारकरी शिक्षण संस्था स्थापन करणे, आधार आश्रम उभारणे, पंढरपूर, आळंदी तीर्थस्थल क्षेत्र ठिकणी ज्ञानपीठ स्थापन करणे. संत शेख महंमद महाराज आषाढी - कार्तिकी पालखी सोहळा उत्कृष्ट नियोजन करणे आदि.

उन्हाळी सुटीमध्ये बाल सुसंस्कार शिबीरांचे आयोजन करणे. व्यसनमुक्त चळवळ राबवने. सांस्कृतिक, कीर्तन मोहात्सवाचे आयोजन करणे आदी. ब्लड डोनेशन कॅम्प, नेत्र तपासणी शिबीर, संगीत भजन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आदी. आयोजन करणे. वृक्ष लागवड करून जतन संवर्धन करणे.

Our Team

Latest BlogsVIEW ALL

00 M

Total fund raised

00 +

Successful events

00 +

Worldwide volunteers

00 +

Our donner

Our Activities

Volunteer Testimonials